येरमाळा/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील येरमाळा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत १३ पैकी१३ जागेवर विजयश्री प्राप्त केली आहे.
15 वर्षापासून या सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती.परंतु यावर्षी निवडणूक बिनविरोध न करता निवडणूक लढण्यासाठी काही जणांनी अट्टाहास धरला होता.या निवडणुकीत जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी लक्ष घातल्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. दोन्ही पॅनल कडून विजयाचे दावे करण्यात येत होते.
येरमाळा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुक माजी मंञी आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी सभापती विकास बारकुल यांच्या नेत्तृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर शिवसेना पुरस्कृत येडेश्वरी शेतकरी समृध्दी पॅनल या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होती बुधवार दि.२० रोजी येरमाळा विकास सोसायटीची निवडणुक कार्यक्रमानूसार मतदान पार पडले आणि लगेच मतमोजणी करण्यात आली यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅनल दणदणीत विजयी झाला असुन यामध्ये श्री बांगर उमाकांत निवृत्ती,श्री बारसकर रुद्राप्पा भिमाशंकर,श्री बारकुल मुंकुद परसराम,श्री बारकुल रामकृष्ण बब्रुवान,श्री बारकुल रावसाहेब विश्वनाथ,श्री बारकुल विकास किसन,श्री जाधव सुनिल तुळशिराम,लाटे विकास तुकाराम तर महीला मध्ये सौ. पद्मीनबाई उध्दव बारकुल,सौ.दमाबाई विलास देशमुख,तसेच अनुसूचित जाती जमाती मध्ये श्री सतिश विश्वनाथ निचळे, इतर मागास मध्ये बांगर रमेश दिंगबंर ,श्री शब्बीर हूसेन आत्तार यांनी विक्रमी मते घेऊन निवडुन आले आहेत.निवडणुकीच्या सुरवातील दोन पॅनल मध्ये मोठी रस्सीखेच होऊन तगडी लढत होईल असे दिसत होते पंरतु मतदाराने आपला कौल भारतीय जनता पार्टीला दिल्याने भाजपाने येरमाळा विकास सोसायटीवर एकहाती सत्ता काबिज केली आहे.
येरमाळ्यातील ग्रामपंचायत वर सुद्धा 20 वर्षापासून विकास बारकुल यांचीच एक हाती सत्ता आहे आता सोसायटी ही ताब्यात आल्यामुळे विकास बारकुल यांचे पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पॅनल प्रमुख विकास बारकुल यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
0 Comments