Subscribe Us

युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न.


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
भारतीय जनता पार्टीची युवा नेते मल्हार राणाजगजितसिह  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि. 27 जून) रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना मोफत  ई-श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम अमोल भैया पेठे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रभागातील 200 नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला.
    या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील काकडे आबा इंगळे राहुल काकडे प्रीतम मुंडे सुजित साळुंखे संदीप इंगळे निखिल चांदणे लखन बगाडे अमोल शिंदे सचिन लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती         मागील दहा वर्षापासून अमोल भैया पेठे मित्र मंडळ सामाजिक कार्यात सक्रिय असून सामुदायिक विवाह सोहळे, रक्तदान शिबिर महापुरुषांच्या जयंती साजरा करणे गरजूंना शालेय साहित्याचे वाटप करणे ,रुग्णांना फळे वाटप करणे ,जनधन खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करणे कोरोणा काळात गरजूंना धान्याची किट उपलब्ध करून देणे संकट समयी मदत करणेअशा कार्यातून त्यांनी शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.         
   र्ह -श्रम कार्ड वाटप कार्यक्रमास भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  अमोल भैया पेठे  मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments