Subscribe Us

राणाजगजितसिंह पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागावी म्हणून आई तुळजाभवानी मातेला भाजपा महिला मोर्चा कडून साडी,चोळी,खणानारळाने ओटी भरुन देवीकडे साकडे घातले ..


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
    भाजपा महिला मोर्चा धाराशिवच्या वतीने  तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते राणाजगजितसिंह पाटील साहेब यांची कॅबिनेट मंत्रीमंडळात वर्णी लागावी म्हणून आई तुळजाभवानी मातेला साडी,चोळी,खणानारळाने ओटी भरुन देवीकडे साकडे घातले.
     ..उस्मानाबाद  जिल्ह्यातील भाजपा चे पहिले आमदार, अभ्यासू नेतृत्व, लोकनेते  राणाजगजितसिंह पाटील यांची नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीमंडळात वर्णी लागावी म्हणून भाजपा महिला मोर्चाकडुन आई तुळजाभवानीची आरती करुन तिची साडी,चोळी आणि खणानारळाने ओटी भरुन, तिच्या चरणी दंडवट घालुन साकडे घालण्यात आले.
       देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती की, तुळजापुर तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे करणार तसेच मागील सरकारच्या काळात देखील राणादादांनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र प्रशाद योजनेत समावेश करावा म्हणून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला होता.
     सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्गास गती मिळवण्यासाठी,तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्यासाठी प्रयत्न होण्यासाठी,व आई तुळजाभवानी माता ही स्त्री शक्ती स्वरूप असल्याने याठिकाणी महिलांच्यासाठी उद्योग निर्मिती करण्यासाठी आदरणीय राणाजगजितसिंह पाटील यांना कॅबिनेट मंत्रीमंडळात घेतल्यानंतर नक्कीच प्रयत्न होतील असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या सर्व महिला पदाधिकारी यांना वाटतो असे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे यांनी सांगितले.
    यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या .जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे,तुळजापूर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ॲड. क्रांती थिटे , भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने , जिल्हा सरचिटणीस जोशीला लोमटे , लता पेठे ,रंजना पेठे आदी भाजपाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments