Subscribe Us

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा येरमाळा येथे सत्कार.


येरमाळा/ तेरणेचा छावा:-
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने  घवघवीत यश मिळवल्याबद्दल भारतीय जनता पार्टी येरमाळा व परिसर यांच्या वतीने, महाराष्ट्र राज्य  विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते, प्रवीण दरेकर  राज्याचे माजी मंत्री, गिरीश महाजन.  आमदार,राणाजगजितसिंह पाटील.शिवसंग्राम चे नेते आ. विनायक मेटे ,भाजपा जिल्हाध्यक्ष, नितीन  काळे , श्री  सुधीर अण्णा पाटील  यांचा शनिवार (दि. 11 जून )रोजी सायंकाळी 7.00 वाजता  छत्रपती संभाजी महाराज चौक चौरस्ता येरमाळा येथे जंगी स्वागत करून सत्कार येरमाळा नगरीचे भाजप नेते विकास (भाऊ )बारकुल यांच्या हस्ते करण्यात आला. 
     या वेळी माजी जि प सदस्य  मदन बारकुल  माजी सरपंच तानाजी सवने दशरथ जाधव उपसरपंच गणेश बारकुल  चोराखळी चे सरपंच खंडेराव मैंदाड  भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रामकिसन कोकाटे  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भगवान ओव्हाळ.  शिवाजी बाराते उपळाई चे सरपंच  विठ्ठल मुंडे  बाबूभाई शेख  बांगरवाडी चे सरपंच राजाभाऊ बांगर  रत्नपुर चे मा.सरपंच हनुमंत जाधवर ,विजय देशमुख , निशिकांत गायकवाड  रफिक सय्यद  दत्ता बारकुल  यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments