Subscribe Us

उस्मानाबाद येथील ट्रान्सपोर्ट मालकाला जीवे मारण्याची धमकी.


व्यवसायिक प्रतिस्पर्धी असल्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची दिली धमकी! 
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
    उस्मानाबाद येथील ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या मालकाला पनवेल येथील एका ट्रान्सपोर्ट मालकांनी  जिवे मारून टाकण्याची धमकी घटना घडली आहे.
    याविषयी सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद येथील ट्रान्सपोर्ट चालक  राहुल शेषराव लंगडे हे रविवार दि. 12 जून रोजी सायंकाळी 5:00 वाजता बार्शी नाका उस्मानाबाद येथे असताना त्यांना मोबाईल क्रमांक 7666224929  वरून फोन आला व त्यांनी पूर्ण नाव विचारून तू टॅंकर चा धंदा करतोस का असे म्हणून आई व बहिणीवर शिवीगाळ केली व तीन दिवसात जीवे मारण्याची धमकी दिल्याची गेल्याची घटना घडली आहे. सदर धमकी देणारा चे नाव बाळासाहेब सुभाष बोराडे सावरगाव ता. भूम जि .उस्मानाबाद सध्या वास्तव्यास पनवेल येथे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत असल्याचे समजते
 या घटनेची तक्रार आनंद नगर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे या घटनेमुळे उस्मानाबाद परिसरातील व्यवसायकात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments