Subscribe Us

संकट समयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही. खा.ओमराजे निबाळकर


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
   उध्दव ठाकरेंनी माझ्या विरोधकाला म्हणजे राणाजगजीतसिंह पाटील यांना केवळ माझ्यामुळे शिवसेना पक्षात घेतले नाही. विधानसभा निवडणुकीवेळी उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती त्यावेळी राणा पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्याची तयारी दाखवली मात्र माझा संघर्ष त्यांनी बघितलेला असल्याने त्यांनी राणा पाटलांना तिकिट नाकारले असा गोप्यस्फोट ओमराजे निंबाळकर यांनी केला
      मला उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम सत्ता दिली त्यामुळे अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही असे सांगत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा एकही खासदार पक्ष सोडून जाणार नाही असे त्यांनी तेरणेचा छावा शी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments