Subscribe Us

युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत ई-श्रम कार्ड वाटप


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
    भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि. 27 जून) रोजी उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना मोफत ई-श्रम कार्ड  काढून मिळणारअसल्याचे  प्रभागातील  सामाजिक व युवा नेतृत्व ,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अमोल भैया पेठे यांनी सांगितले आहे.
       उस्मानाबाद शहरातील सामाजिक व भाजप कार्यकर्ते अमोल भैया पेठे मागील 10 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवून शहरवासीयांची सेवा करत आहेत  सामुदायिक विवाह सोहळे ,महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे ,रक्तदान शिबिर , रुग्णांना फळे वाटप ,गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,गरजूंना कपडे वाटप कोरोणा काळात गरजू लोकांना मदतीचा हात, गोरगरिबांना जनधन खाते उघडण्यासाठी विविध ठिकाणी कॅम्प आयोजित केले होते यासारखे अनेक उपक्रम राबवून त्यांनी जनमानसात वेगळा ठसा निर्माण केला आहे.
  भाजपचे युवा नेते मा. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेसाठी मोफत ई-श्रम कार्ड काढून देण्यासाठी सोमवार दिनांक 27 जून रोजी एलपीजी गॅस पंपाच्या बाजूला विजय नगर उस्मानाबाद येथे  कॅम्प आयोजित केला आहे तरी ई- श्रम कार्ड योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून घेण्याचे आवाहन अमोल भैया पेठे व मित्रपरिवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments