येरमाळा/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील येरमाळा गावच्या पाणी पुरवठ्याला पर्यायी पाणी पुरवठा योजना राबिवण्यात येत असल्याने काही दिवसातच गावास मुबलक पाणी पुरवठा होणार असुन पुढील काळामध्ये वाढणारी गावची ताण भागणार आहे त्यामुळे गावासाठी दुसरी पाणीपुरवठा योजना चालू करून भाजपा नेते विकास बारकुल यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे..
येरमाळा ता. कळंब ग्रामपंचायतच्या वतीने म्हणजेच १५ वित्त आयोगातुन पर्यायी पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ माजी. सभापती विकास बारकुल यांच्या हस्ते गुरुवार (दि .16 जून) रोजी करण्यात आला.यावेळी जि.प.सदस्य मदन बारकुल,उपसरपंच गणेश बारकुल,तानाजी सवने,विजय देशमुख,,रफीक सय्यद,ग्रा.प.सदस्य विलास बारकुल,दत्ता बारकुल,मनोज बारकुल,दशरथ जाधव,महेश बाारकुल,विलास बारकुल,आदी उपस्थीत होते.
यावेळी विकास बारकुल म्हणाले की,येरमाळा गावास सध्या बांगरवाडी साठवण तलावावरील सार्वजनिक विहीरीहून पाणी पुरवठा होत असुन येथे सतत विद्युत पुरवठा खंडाच्या समस्येमुळे तसेच अपुर्या विद्युत पुरवठ्यामुळे (८ तास ३फेस) पाणी पुरवठा विसकळीत होत असल्याने सतत पाणी पुरवठा खंडीत होत आहे यांचे गाभिर्य लक्षात घेता येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने १५ वित्त आयोगाअंतर्गत विहीर,व आडके तळे ते पाणी पुरवठा पाण्याची टाकी पाईप लाईन (अंदाजे१ किमी) ही पर्यायी पाणी पुरवठा योजना कार्यावित करण्यात येत असुन पाणी पुरवठा विहीर ही मनरेगा अंतर्गत घेण्यात आली असुन आज दि.१६ रोजी पाईपलाईन शुभारंभ करण्यात आला आहे. या पर्यायी पाणी पुरवठा योजनेमुळे गावचा तात्पुरता पाणी प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे तसेच येथील वाढीव वस्ती लक्षात घेता या योजनेमुळे गावची ताण भागणार आहे. येरमाळा गावासाठी व परिसरासाठी आणखी नवनवीन योजना आणून गावाच्या व परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे विकास बारकुल यांनी तेरणेचा छावाशी बोलताना सांगितले .
0 Comments