दहिफळ/ तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील जि.प माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय सन २०२२च्या १२ वि चा निकाल ९८.८२ लागला असून येरमाळा केंद्रात येथील विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला आहे.
प्रथम आकांक्षा अंगरखे, द्वितीय सानिका लाटे,तर तृतीय क्रमांकाने अमृता मते यांनी यश संपादन केले आहे.
दहिफळ येथे परिसरातील एकमेव १२ वी पर्यंत वर्ग असणारी जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे. ग्रामीण भाग असल्याने या शाळेत मुलींचे प्रमाण अधिक असुन शिक्षण चांगले मिळत असल्यामुळे शाळेची गुणवत्ता कायम आहे यापुर्वी सलग तीन वर्षे या विद्यालयाने शंभर टक्के निकाल ठेवलेला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे पालकातुन समाधान व्यक्त होत आहे.येथे शाळेसाठी जिल्हा परिषदची भव्य इमारत असुन निसर्गाच्या सान्निध्यात हि शाळा भरते. येथील शिक्षकांचा शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो.
12 वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक सरपंच चरणेश्वर पाटील ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम मते ,मुख्याध्यापक दत्तात्रय वनवे, यांनी केले आहे. तसेच परिसरातील पालक वर्गातून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कौतुक होत आहे
0 Comments