Subscribe Us

पोलीस अधीक्षक श्रीमती निवा जैन यांची येडाई व्यसनमुक्ती केंद्राला भेट


येरमाळा/ तेरणेचा छावा :-
उस्मानाबादच्चा पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी गुरुवार ( दि.24 मार्च )रोजी येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राला केंद्राला भेट देऊन तेथील उपचाराची पद्धती जाणून घेतल्या .
       यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांना मार्गदर्शन  करताना नीवा जैन म्हणाल्या व्यसनमुक्त झाल्यानंतर समाजासाठी चांगलं काम करून समाजासाठी एक आदर्श निर्माण करावा.तसेच व्यसनमुक्तीचे  काम करणाऱ्या डॉ. संदीप तांबारे यांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रातील कामाचे कौतुक करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले,तसेच पुढील  कामासाठी शुभेच्छा दिल्या.
  येणाऱ्या काळात पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्ती चळवळीला बळ देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करणार असल्याचे यावेळी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक  पोलीस अधीक्षक एम.रमेश  येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मोरे सह पोलीस कर्मचारीउपस्थित होते.
    
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी  येडाई  व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापन बापूराव हुलुले,राजेश तामाने व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments