येरमाळा/ तेरणेचा छावा:-
येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा यावर्षी होणार असुन प्रशासनाच्या शुक्रवार दिनांक 25 मार्च रोजी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करुन पन्नास टक्के क्षमतेने यावल यात्रेचे नियोजन करण्यात येईल असे उपविभागिय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी स्पष्ट केले.बैठकीला विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी,देवस्थानचे पुजारी,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमेला होणारी मोठी यात्रा गेल्या दोन वर्षांपासून रद्द केली होती.मात्र कोरोनाचे निर्बंध कांहीअंशी कमी झाल्याने यात्रेबाबत प्रशासनाने शुक्रवारी(ता.२५) नियोजन बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीच्या अध्यक्ष उपविभागीय अहिल्या गाठाळ यांनी यावेळी या वर्षी यात्रा होणार असून कोरोना संसर्ग क्षमता पाहता राज्यातील सोळा जिल्हे निर्बंध मुक्त झाले असले तरी आपला जिल्हा निर्बंधात असुन कोरोनाचे मास्क,सॅनिटाझर,आणि सुरक्षित अंतराच्या निर्बंधात पन्नास टक्के क्षमतेत भरविली जाईल असे सांगितले.यात्रा काळात गर्दीने होणारे विधी सुरक्षित अंतर ठेवून पन्नास टक्के क्षमतेने करावे असे सूचित करुन या वर्षीच्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा होणार यावर शिक्कामोर्तब केले.
या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी एम.रमेश,तहसीलदार मुस्तफा खोंदे,सपोनि दिनकर गोरे,वैद्यकीय अधिकारी सुधाकर बिराजदार,महावितरण च्या सहाय्यक अभियंता आर.ए.शितोळे,वाहतूक नियंत्रक रामलिंग शिंदे,सरपंच तबसुम सय्यद,माजी सरपंच विकास बारकुल,उपसरपंच गणेश बारकुल,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे उपस्थित होते.
या बैठकीला गावतील ग्रामस्थ,पुजारी,मानकरी,राजकीय पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कोरोनाच्या निर्बंधात होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने,भाविकांच्या सुखसोई,सुरक्षितता,वाहतूक व्यवस्थेवर तसेच विविध प्रशासकीय विभाकडून यात्रा काळात केल्या जाणाऱ्या विविध उपाय योजनेवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली,तसेच यात्रेच्या काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजने बाबत उपस्थित ग्रामस्थ,राजकीय पदाधिकारी यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.
ही यात्रा प्रशासकीय नियोजन बैठक येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात शांततेत पार पडली.
या बैठकीचे सूत्रसंचालन समाधान बेदरे यांनी केले.
0 Comments