Subscribe Us

कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल!


शाळा,जीम, पार्क बंद ,  

लग्न सोहळ्यासाठी 50, अंत्यविधीसाठी 20, धार्मिक राजकीय कार्यक्रमासाठी 50 लोकांची उपस्थिती बंधनकारक

उस्मानाबाद - तेरणेचा छावा:-

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार शाळा कॉलेज हे 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत तर स्विमिंग पूल, जिम , स्पा, ब्युटी पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पार्क , प्राणी पक्षी संग्रहालय , पर्यटन् स्थळे, किल्ले हे बंद असणार आहेत तर मॉल व कॉम्प्लेक्स हे 50 टक्के मर्यादेत सुरु असणार आहेत , राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे आदेश काढले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहे. 
    सलून,खासगी कार्यालय, पिक्चर थीयटर हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील तर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. शाळा सोबत कोचिंग क्लास पण 15 फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहेत. लग्न सोहळ्यास 50 लोकांची उपस्तीथी, अंत्यविधी 20 तर समाजिक,धार्मिक,राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांस 50 लोकांची उपस्तीथी बंधनकारक असणार आहे.रेस्टोरेंट,नाट्यगृह हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 
       दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार. ५०% नाट्यगृह, सीनेमागृह राज्यातील हाँटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक असणार आहे. सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे.
प्रवाशी व्यक्तिक वाहनाने वाहतूक सुरु राहील तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरु राहील मात्र लसीकरण बंधनकारक असणार आहे. मंदिरे, धार्मिक स्थळे याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments