तेरणेचा छावा/कळंब :-
तालूक्यातील भोगजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भारत बलभिम आडसूळ तर उपाध्यक्षपदी समाधान राधाकिसन खराटे यांची 31डिसेंबरच्या पालक बैठकीतून बिनविरोध निवड करण्यात आली
शासन निर्देशानुसार शालेय व्यवस्थापन समितीची निवड करणे क्रमप्राप्त होते परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे ही निवड रखडलेली होती. शालेय समितीच्या निवडी संदर्भात शाळेत पालक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .उपस्थित पालकांमधून शालेय समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री बालासाहेब चौधरी यांनी शालेय समितीची हक्क आणि कर्तव्य उपस्थितांना सांगितली त्यानंतर नियुक्त सदस्यांमधून अध्यक्षपदी भारत आडसूळ तर उपाध्यक्षपदी समाधान खराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून दादासाहेब साहेबराव खराटे, रामराजे आप्पाराव आडसूळ, श्रीमती आश्विनी किरण आडसूळ, आशा सुनिल मेैंद, अनुसया लक्ष्मण पवार, संगिता लक्ष्मण पवार, ज्योती महेंद्र रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर पालक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . शाळेच्या भौतिक सुधारणेबरोबरच गुणवत्ता वाढीकडे लक्ष्य देण्याचे ठरले .
सदर बैठकीसाठी शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब चौधरी, विश्वास भोसले सर, धनंजय गव्हाणे सर, बाबासाहेब उबाळे सर, बिभीषण मुंडे सर यांनी परिश्रम घेतले
0 Comments