पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
तेरणेचा छावा -उस्मानाबाद
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यावेळी युवा सेनेच्या तालुका युवती अधिकारी पदी भारती गायकवाड तर उपतालुका युवती अधिकारी म्हणून येरमाळा येथील सौ दिव्या पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक म्हणून संगीता क्षीरसागर यांची देखील निवड करण्यात आली. या नियुक्त्या शिवसेना पक्षात उस्मानाबद जिल्ह्यातील महिला व तरुणी मोठ्या प्रमाणात शिवसेना सहभागी होऊन पक्षाचे मजबुतीकरण करण्यासाठी करण्यात आले आहेत. या झालेल्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातून सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.
शिवसेना युवासेना सारख्या बलाढ्य पक्ष संघटनेचा पदभार स्वीकारण हे माझ्यासाठी एक जबाबदारी आहे. आगामी काळात अधिक सक्रियपणे काम करत युवतीं व महिलांचे प्रश्न समजून घेत संघटना वाढीसाठी प्रयत्न करत राहीन.
दिव्या पाटील
उपतालुक प्रमुख युवती अधिकारी, कळंब
0 Comments