कळंब,/तेरणेचा छावा:-(कै राजकुमार काळभोर साहित्य नगरी) छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास मांडला गेला आहे. पुर्वी केलेल्या इतिहासातील चुका खोडून काढण्यासाठी हयात गेली आहे. योग्य दाखले मांडून संभाजीराजे यांच्या इतिहास समोर मांडण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ सतीश कदम यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लेखक चित्रपट निर्माते शरद गोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील तर विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक, भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, सिने अभिनेने सुनील साबळे, सामाजिक संस्थेचे सचिव विश्वनाथ तोडकर, परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर जिल्हाध्यक्ष अशोक कुरुंद, तालुकाध्यक्ष अश्रूबा कोठावळे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ सतीश कदम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये बेबनाव होता, संभाजीराजे मुगलांना मिळाले असा इतिहास मांडला गेला, हा इतिहास चुकीचा आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा नाटकाच्या माध्यमातून चुकीचा मांडण्यात काल्पनिक पात्र तयार करण्यात आले आहेत. मात्र हे तयार केलेल्या काल्पनिक पात्रांची इतिहासात कोठेही नोंद नाही. त्यामुळे हा इतिहास खोटा असल्याचे उघड होते.
छत्रपती संभाजी महाराज हे विर योध्दा होते, औंरगजेब ने संभाजीराजे यांना पकडण्यासाठी आठ सरदारांची नियुक्ती केली होती. या सरदारांना आठ वर्षे, आठ महिने खेळवत ठेवले होते. हे त्यांच्या चातुर्याचे प्रतिक आहे असे म्हटले. संमेलनाचे प्रास्ताविक परमेश्वर पालकर यांनी केले तर सुत्रसंचालन अश्रुबा कोठावळे यांनी तर आभार ज्ञानेश्वर पतंगे यांनी मानले. यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद गोरे म्हणाले की छत्रपती संभाजीराजे यांनी १२० लढाया जिंकल्या आहेत, हे मोठे योध्दा होते, त्यांना लढाई मध्ये हरवता आले नाही म्हणून त्यांचे चुकीच्या पद्धतीने चारित्र्यहणन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे यांनी ब्रज भाषेत गवळण तयार केली होती. त्यांच्या अनेक गवळणी जगभरात पोहचलेल्या आहेत.
राज्यकर्त्यांचे धोरण लोकांच्या कल्याणासाठी असावे असे धोरण छत्रपती संभाजीराजे यांचे होते. मात्र आता कल्याणकारी धोरण राज्यकर्ते हे स्वतहाचे हित जोपासण्यासाठी करत आहेत. ही शोकांतिका आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी चार ग्रंथ लिहले आहेत. विशेष म्हणजे १४ व्या वर्षी बुध्दभुषण हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ अलौकिक विचाराचा आहे.
संमेलनात पर्याय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वनाथ तोडकर यांना छत्रपती संभाजी महाराज समाजगौरव पुरस्कार, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. पी. पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज शिक्षणरत्न तर ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना छत्रपती संभाजी महाराज साहित्य जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले . तर छत्रपती संभाजीराजे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार पुरस्कार राहुल झोरी यांना प्रदान करण्यात आला .
छत्रपती संभाजी महाराज यांनी बुध्दभुषण ग्रंथा मध्ये भविष्याचा वेध घेणारा ग्रंथ आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागाचे छत्रपती संभाजीराजे मराठी साहित्य संमेलन घेऊन छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. युग पुरुषांच्या यादी मध्ये छत्रपती संभाजीराजे यांचे नाव घेण्यासाठी पाठपुरावा करणार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्ह्यात साहित्य संमेलन असल्याच मदत करणार असे प्रतिपादन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले.
यावेळी जिजाऊ बहुद्देशीय संस्थेच्या पुरस्कााराचेही संमेलनात वितरण करण्यात येणार आले, यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार - सौ. सुमन धनराज जाधवर, स्वामी विवेकानंद युवा कार्यगौरव पुरस्कार - रणजित महादेव देशमाने, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.प्रतिभा बाळकृष्ण भवर-गांगुर्डे, राजर्षि शाहू महाराज सामाजिक कार्य गौरव पुरस्कार - शिवाजी शहाजी कराळे, राजा रवी वर्मा कलागौरव पुरस्कार - राजकुमार दत्तात्रय कुंभार, बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार - माधवसिंग राजपूत तर छत्रपती शिवाजी महाराज समूह सामाजिक कार्य गौरव पुरस्कार शिवाई प्रतिष्ठान कळंब यांना देऊन गौरविण्यात आले .
बंगळूर येथील व विकृत इतिहास लिहणारयांचा केला निषेध
संमेलनाच्या सुरवातीलाच साहित्य संमेलनात कर्नाटकातील बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच महापुरुषांची बदनामी कारक लिखानाचा ही जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित साहित्य प्रेमींनी हात वर करून निषेध नोंदविला.
0 Comments