Subscribe Us

शालेय परिसरातील विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची भाजपा विद्यार्थी आघाडीची मागणी.

उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- शाळा परिसरातील विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे बुधवार (दि.15 सप्टेंबर )रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‍विद्यार्थ्यांच्या सुर‍क्षिततेच्या दृष्टीकोनातून  सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कावत यांना निवेदन दिले. मागील कांही दिवसापासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस  सुरु झाली आहेत. रा. प. महाविद्यालय परिसर, बार्शी नाका, जिजाऊ चौक, आर्य समाज चौक  अशा ठिकाणी टवाळखोर तरुणांकडून महिला व विद्यार्थीनीना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील सी.सी.टी.व्ही बंद असल्यामुळे महिला सुरक्षा बाबत पोलीस चौकी मदत केंद्र व सी.सी.टी.व्ही सुरु   करणे अत्यंत गरजेचे आहे. असे भाजपा ‍विद्यार्थी आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाला ‍निदर्शनास आणून दिले. तरी प्रशासनाने  योग्य ती दखल घ्यावी असे  आवाहन केले. 

     यावेळी ‍भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल पृथ्वीराज पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चनाताई आंबुरे, सर‍चिटणीस देवकन्या गाडे,‍  सचिन लोंढे, प्रसाद मुंडे, सुरज शेरकर, आदित्य माने, सार्थक पाटील, अजीत गाढवे इत्यादी भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments