.
उस्मानाबाद/तेरणेचा छावा: -- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, उस्मानाबादच्या साखर कारखान्याच्या २०२१-२२ गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार (दि 30 नोव्हेंबर) रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सुरेश धस, महंत तुकोजी बुवा व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व हितचिंतक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक ॲग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, बालाजी कोरे, विशाल रोजकरी, .ॲड. प्रतीक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, दिनेश कुलकर्णी व प्रथमेश आवटे यांनी केले आहे.
0 Comments