Subscribe Us

लखीमपुर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी जिल्हा बंदचे आवाहन


तेरणेचा छावा:-
केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्याच्या विरोध करणाऱ्या  शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकारने चिरडून टाकले हे अमानुष कृत्य करणारा मोकाट आहे तो खुलेआम फिरत असून त्याला योगी सरकारने अभय दिले आहे या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला आहे अशा या क्रूर  अत्याचारी भाजप सरकार विरोधात ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे यासंदर्भात उस्मानाबाद येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्ह्यातील व्यापारी व सर्वसामान्य जनतेला या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय कुमार सस्ते सिनेट सदस्य संजय निंबाळकर  काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने युवा सेनेचे जिल्हा सचिव सुनील शेळके यांची उपस्थिती होती 
   पुढे बोलताना दुधगावकर म्हणाले की लखीमपुर खिरी येथील घटना ही देशातील लोकशाहीला काळीमा फासणारी आहे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यावर भाजप सरकारने घोर अन्याय केला असून बळीराजाला चिरडून मारण्याचे महापाप भाजपाच्या माथी पडले आहे या घटनेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्या वतीने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा बंदचे आवाहन करीत असून जिल्ह्यातील सर्व व्यापारी व जनतेने या बंदला सहकार्य करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments