Subscribe Us

तेरणा नदीवरील पूल बांधण्याची मागणी.


दहिफळ/तेरणेचा छावा:-
येथील तेरणा नदीवरील पूल बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्याची मलकापुर/संजितपुर  ग्रामपंचायतची मागणी
          कळंब तालुक्यातील संजीतपूर हे गाव तेरणा नदीकाठी आहे. नदीला अतिवृष्टीमुळे नदीला पुर आल्यानंतर गावांचा संपर्क तुटतो. म्हणून या ठिकाणी बांधकाम विभागात मार्फत मोठा पूल होण्याची गरज आहे . या बांधकामासाठी  विकास निधीची आवश्यकता आहे .म्हणून ग्रामीण विकास राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ह्या निधीची पूर्तता करावी अशा मागणीचे निवेदनाद्वारे केले आहे . ग्रामीण विकास राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दि.८ ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे केली  आहे. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटिल,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव समाधान बाराते , उपसरपंच सुधिर पायाळे  आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments