Subscribe Us

राष्ट्रवादी युवकच्या पुढाकाराने दहिफळकरांना मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.


दहिफळ/तेरणेचा छावा:-
     कळंब तालुक्यातील दहिफळ येथे संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्ताने गावात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे आले असता त्यांना गावातील नागरिकांनी वैद्यकीय सोयीसाठी रुग्णवाहिकेची मागणी असता त्यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या कडे रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा केल्यामुळे दि.५ ऑक्टोबर रोजी दहिफळकरांना भेटलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे,सरपंच चरणेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते भास्करराव खोसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे,तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,  वक्ता सेल प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,कळंब शहराध्यक्ष मुसद्दीक काझी,अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष वसंत घोंगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष उमेश मडके, तालुका सचिव समाधान बाराते, तालुका उपाध्यक्ष अमोल काळे,सुधीर मते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हनुमत मते माजी सरपंच डी एस भातलवंडे सूर्यकांत ढवळे ,प्रवीण पाटील प्रभाकर भातलवंडे,समाधान मते,प्रतिक मते,रोहन मते,लखन भातलवंडे,प्रकाश पुरी ,सुपर वायझर घोणसे पाटिल.डॉ मुंडे, राऊत , नागटिळक, ड्रायव्हर दत्ता मते कर्मचाऱ्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments