Subscribe Us

अटी शर्ती घालून विमा नाकारला तर,विमा कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करू:- संजय पाटील दुधगावकर


दहिफळ/तेरणेचा छावा:- 
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील  शेतकऱ्यांशी संजय पाटील दुधगावकर यांनी संवाद साधला.शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.अतिवृष्टी मुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून,शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे.लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आपण शासनाकडे मागणी केली आहेच.पण विमा कंपनीने सुध्दा आता शेतकऱ्यांचा अंत बघू नये.दरवर्षी प्रीमियम भरून घ्यायचा मात्र निरनिराळ्या अटी शर्ती लाऊन,झालेल नुकसान नाकारायच व  विम्याची मदत नाकारायची.हेच जणू दरवर्षी विमा कंपनीचा धोरण बनलेल आहे.यावर्षी मात्र प्रचंड नुकसान झाले असून,सरसकट नुकसान मान्य करून.शेतकऱ्यांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.याहीवर्षी जर अटी शर्ती लाऊन कंपनी नुकसान भरपाई नाकारणार असेल.तर मग मात्र बजाज अलियांस विमा कंपनीवर बहिष्कार घालून कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करू.अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आज दहिफळ येथे पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता मांडली.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments