Subscribe Us

डॉ.संदीप तांबारे यांच्या व्यसनमुक्ती कार्याची राज्यपातळीवर दखल.


       उस्मानाबाद/तेरणेचा छावा : -
येडाई व्यसनयुक्ती केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस व्यसनमुक्ती सेलचे राज्यप्रमुख डॉ.संदीप तांबारे यांची  व्यसनमुक्ती  कार्याबद्दल राज्यपातळीवर दखल  घेऊन राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. भगतसिंग कोश्यारी  यांच्या हस्ते डॉ. संदिप तांबारे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
     राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्था व सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी खासदार गोपाल शेट्टी, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, पार्श्वगायक उदित नारायण, ब्रह्मकुमारी योगिनी दीदी यांच्यासह डॉ.राजकुमार गवळे, डॉ.दिपाली जाधव , डॉ.उल्का नायर, अनिशा सुर्यवंशी, डॉ.योगेश दुबे, शेख रिहाज बशीर, संतोष कुमार देशमुख, डॉ.अनंत मुळे, अशोक सावंत, विश्वासराव काटमांडे, व अनिता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्थेचे रुद्रप्रताप बिस्वास, सह्याद्री फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.संदिप तांबारे यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रातील जनजागृती,उपचार व संशोधन कार्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. डॉ.संदीप तांबारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे राज्यभरातील व्यसनमुक्ती कार्यकर्ते, हितचिंतकातून कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments