तेरणेचा छावा/दहिफळ:-
कळंब तालुक्यातील मोहा येथिल शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि.१९) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमास ज्ञान प्रसार मंडळ येरमाळा चे सचिव डॉ अशोकराव मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहेकर मल्टीस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके हे होते याप्रसंगी हनुमंत मडके यांनी मोहेकर मल्टीस्टेट चा लेखा-जोखा तसेच संस्थेचा वाढता आलेख ग्रामस्था समोर मांडला.याप्रसंगी मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक संतोष मडके ,सरपंच राजु झोरी, उप सरपंच सोमनाथ मडके,मोहेकर ॲग्रोचे संचालक बापुराव शेळके,वि.वि.ध कार्यकारी सोसायटी चे माजी चेअरमन अंनतराव मडके,बाबासाहेब मडके, अशोक मडके,अच्युत मडके, फुलचंद मडके,माणिक आरकडे तसेच कर्मचारी वर्ग व गणमान्य सभासद शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प बापु जोशी केले तर आभार मोहेकर ॲग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके यांनी मानले.
0 Comments