Subscribe Us

खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याची ग्रामसभेत मागणी.


तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड.
दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळब तालुक्यातील दहिफळ येथे दि.३०ऑगष्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ग्रामसभेचे आयोजन केले होते.अध्यक्ष स्थानी सरपंच चरणेश्वर पाटील होते.तर सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांनी कामकाज पाहिले.या ग्रामसभेत मागील सभेचे वाचन करणे, गावात सी सी टिव्ही कॅमेरे बसवणे, स्वच्छ, सुंदर गाव, घनकचरा व्यवस्थापन करणे,घर तिथे एक झाड लावणे व वृक्षलागवड योजना राबविणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करणे , सार्वजनिक मुतारी बसविण्यासाठी जागा निश्चित करणे,कोवीड १९ उपाययोजना, नियोजन, लसीकरण करणे,रमाई आवास योजना प्राधान्य यादी तयार करणे,१५वा वित्त आयोगाचा आराखडा २०२१-२२ मंजूर करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर खोलीकरण व बांधकाम करणे,ट्रोन सर्वेक्षण करणे बाबत प्रस्ताव सादर करणे,शाळा इमारत पाडणे,पहिली ते चौथी वर्ग सुरू करणे, कचरा डेपो व्यवस्थापन जागा निश्चित करणे,तांडा वस्ती आराखडा व काम प्रस्तावित करणे,आदी एकुण २३ मुद्द्यावर चर्चा झाली.ग्रामस्थांच्या उपस्थित अनेक मुद्द्यांवर ठराव मंजूर करण्यात आले.
तसेच ऐन वेळच्या विषयावर चर्चा झाली असून गावातील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान परिसरात अतिक्रमण काढण्याची वारुवाले यांनी मागणी केली.विशेष ग्रामसभा बोलावून अतिक्रमण निश्चित करून ते काढण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांनी दिले.तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान पाहता गावातील पहिली ते चौथी वर्ग सुरू करण्यात यावे असा ठराव शेखर पाटील यांनी मांडला,पालकांची विशेष बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे सरपंच चरणेश्वर पाटील म्हणाले.
    गेल्या चार वर्षांपासून तंटामुक्त समिती अध्यक्ष पद रिक्त होते.याबाबत चर्चा केली असता सर्वानुमते ईच्छु उमेदवार कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसभेसाठी  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments