दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मोहा येथिल शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात तसेच मोहेंकरॲग्रो इंडस्ट्रीज येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजीची 94वी जयंती मंगळवार (दि.२९ जुलै) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
याप्रसंगी शिक्षण महर्षी मोहेकर गुरूजींच्या प्रतिमेचे पूजन मोहेकर मल्टीस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या)मडके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक विशाल मडके,सरपंच राजु झोरी, माजी सरपंच बाबासाहेब मडके, सुरेश व्होके,सुदाम मडके,धंनजय मडके तसेच मोहेकर मल्टीस्टेटचे मुख्य कार्यालय अधिकारी प्रमोद मडके, श्रीकांत मडके, अतुल मडके, इम्रान शेख,सुरज मडके, राहुल मडके तसेच संस्थेचे कर्मचारी सभासद आदी उपस्थित होते.
0 Comments