Subscribe Us

शिवसंपर्क अभियानांतर्गत विकास कामाचे उद्घाटन व नवीन शिवसेना शाखेचे उद्घाटन करून शिवसेना पदाधिकार्‍याशी संवाद.


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- 
        कळंब तालुक्यातील बोरगाव खुर्द  येथील  विविध विकासकामाचे उद्घाटन आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. 
     आमदार घाडगे पाटील यांच्या पुढाकाराने जवळपास 60 लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सूरु झालेल्या शिवसंपर्क अभियानाच्यावेळी या कामाचे उद्घाटन करण्यात आले.११ ते २४ जुलै दरम्यान शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत नविन शाखांचे उद्घाटन करत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
गेल्या कित्येक वर्षापासुन विकासापासुन दुर राहिलेल्या गावाला आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने विकासाचा मार्ग सापडला आहे.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या निधीमधून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडपासाठी आमदारांनी ११ लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन मोहीमेचे निमित्त साधुन विविध विकास कामाचेही उद्घाटन करण्यात येत आहे.यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातुन 45 लाख रुपयाच्या टाकीचेही भुमिपुजन यावेळी करण्यात आले तसेच बोरगाव खुर्द येथील 14 लाख रुपयाच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, बुथ रचना, बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी यांचा आढावा घेण्यात आला. 
शिवसेनेचा मुळ उद्देश विकासाचा आहे,बोलुन नाहीतर करुन दाखविण्याची कार्यपध्दती स्विकारल्याने निधी मंजुर झाल्यानंतरच त्यावर बोलण्याचा आपला स्वभाव असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. त्यातही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उध्दवजी ठाकरे यांच्या रुपाने दृष्टा नेता असल्याने निधीच्या बाबतीत मतदारसंघातील जनतेने अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. गावासाठी जे - जे आवश्यक असेल त्याचा पाठपुरावा करण्यात मी लोकप्रतिनिधी म्हणुन कधीच कमी पडणार नसल्याचाही विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.त्यामुळे शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी  जनसामान्याच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करुन त्याना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी केली. 
     याप्रसंगी तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदिप मेटे, धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,युवासेनेचे राज्यविस्तारक नितीन लांडगे,अविनाश खापे, युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते,गटनेते सोमनाथ गुरव,प्रवीण कोकाटे,भीमा जाधव, युवासेना तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे, युवासेना शहरप्रमुख गोविंद चौधरी,सरपंच अजय समुद्रे, शाखाप्रमुख महेश समुद्रे, उपाध्यक्ष सचिन समुद्रे, सचिव गणेश समुद्रे, सहसचिव जोतलींग कोरे, कार्याध्यक्ष शरद समुद्रे, कोषाध्यक्ष नवनाथ होदडे, सदस्य आकाश समुद्रे, मारुती होदडे, दीपक कोरे, प्रशांत समुद्रे, वैभव होदडे, अशोक समुद्रे, रवी समुद्रे, शिकांत समुद्रे उमेश जाधव आदींच उपस्थिती होती..

Post a Comment

0 Comments