दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे ग्रामपंचायत कार्यालय व एस एस पी च्या संयुक्त विद्यमाने विलगीकरण कक्षाची स्थापना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.२० जुलै रोजी करण्यात आली.
कोरोना रुग्न आढळून आल्यास गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.प्रथमोपचार या विलिनीकरण कक्षात केले जाणार आहेत.यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.तसेच गावातील डॉक्टर सेवा देणार आहेत.विलगीकरन कक्षाची स्थापना येथील जि.प.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.
विलगीकरन कक्षाचे उद्घाटन सरपंच चरणेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी , किरण माने एस.एस.पी संस्था उस्मानाबाद, उपसरपंच अभिनंदन मते, सदस्य बालाजी गोरे,पुनम गोरे, प्रदिप भातलवंडे,माजी उपसरपंच बालाजी मते,रंजीत काकडे, समाधान मते, वसंत धोंगडे, राजेंद्र भातलवंडे ,ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे, पोलीस पाटील मनेश गोरे ,वैद्यकीय अधिकारी मिनाक्षी लामतुरे, डॉ एम डी गिरी, डॉ.व्यंकटेश दिवाणे, डॉ.मनगीरे, डॉ.धीरज गिरी मुख्याध्यापक जमाले सर,शिक्षक चंद्रशेखर पाटील, बालाजी कदम ,दिलशाद तांबोळी,सिना सय्यद, अंगणवाडी कार्यकर्ती वत्सलाबाई मते ,शारदा शिंदे,शामल काकडे, अंजली ढवळे, रंजना कदम ,शितल गोरे ,वैशाली बोरके रज्जाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments