उस्मानाबाद /तेरणेचा छावा:-
सोमवार (दि.१९ जुलै) रोजी स्थळ मॅट्रीमोनी च्या शाखेचे माणिक चौक उस्मानाबाद येथे आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते आणि नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर,माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे, मोहेकर शुगर ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन हणूमंत (तात्या) मडके, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास जि.प.माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,नितीन बागल, मोहाचे सरपंच राजू झोरी, मोहाचे माजी सरपंच बाबासाहेब मडके, पंचायत समिती सदस्य प्रशांत धोंगडे, सुभाष डोंगरे, गायकवाड यांची देखील उपस्थित होती हा उद्घाटन सोहळा सर्व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करत मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून स्थळ मॅट्रीमोनीने महाराष्ट्रातील जनतेला वर- वधू संशोधनासाठी तंत्रशुद्ध ऑनलाइन मंच उपलब्ध करून दिला आहे (www.sthamatrimony.com)
उस्मानाबाद येथील शाखेपासून आँफलाईन पद्धतीने स्थळे शोधण्याचा पर्याय स्थळ मॅट्रीमोनी उपलब्ध करून देत आहे आता अपेक्षेनुसार व खात्रीशीर स्थळे मिळवण्यासाठी आमच्या माणिक चौक उस्मानाबाद येथील शाखेला नक्की भेट देण्याचे आवाहन शाखेतर्फे सौ संचालिका रंजना मडके यांनी केले आहे.
0 Comments