उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- हेमंत सुनील सिंगारे राहणार शेलगाव तालुका कळंब यांच्या मालकीचा स्वराज्य 855 ट्रॅक्टर चोरी करून विकणारा गावातीलच सुरज उर्फ बापू दादासाहेब शिनगारे याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडून गजाआड केले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की हेमंत सुनील शिनगारे यांच्या मालकीचा स्वराज 855 लाल कलरचा ट्रॅक्टर चोरी गेल्याची फिर्याद 25 3 2021 रोजी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद या पथकाने करून संशयित सुरज उर्फ बापू दादासाहेब शिनगारे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता ट्रॅक्टर चोरल्याचे कबूल करून मध्यरात्री ट्रॅक्टर परांडा करमाळा मार्गे इंदापूर गाठून तेथे पंपावर उभा केला व मी स्वतः ट्रॅक्टर मालक असून मी कर्जबाजारी असल्यामुळे ट्रॅक्टर विकत विकणार आहे असे दत्तू भिसे यांना आपण घ्यावा असे म्हणाला त्यांनी कागदपत्रांची मागणी केली असता मी नोटरी करून देतो व नंतर गावाकडून कागदपत्र आणून देतो म्हणून तीन लाख रुपयाला ट्रॅक्टर विकला व एक लाख रुपये ॲडव्हान्स घेतले. असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास सांगितले
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या पथकातील सपोनि एम डी निलंगेकर, पोलीस कॉन्स्टेबल काझी, अशोक ढगारे ,पांडुरंग सावंत यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शिताफीने तपास करून आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे शेतकर्यांचा चोरी गेलेला ट्रॅक्टर मिळवून दिल्याबद्दल जनतेतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments