उस्मानाबाद/तेरणेचा छावा: – जिल्ह्यात कोरोणाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उपलब्ध बेड अपुरे पडू लागल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे .पुढील धोक्याचा काळ लक्षात घेऊन उस्मानाबाद येथे 500 खाटाचे व कळंब उपजिल्हा रुग्णालय येथे 200 खाटाचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत अशी मागणी आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोणाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून ॲक्टिव रुग्नसंख्येने साडेपाच हजारांचा पल्ला पार केला आहे .जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची संख्या अपुरी पडत असून ऑक्सीजन व इंजेक्शन देखील अपुरे पडत आहेत. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण सोबतच त्याच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असून मृत्यूच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. आगामी काळात अशी संख्या वाढत राहिली तर पुढील धोका लक्षात घेऊन उस्मानाबाद शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात पाचशे खाटाचे जम्बो कोविड सेंटर व कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात 200 खाटाचे कोविड सेंटर उभारण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत अशी मागणी उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर मोठ्या प्रमाणात उस्मानाबाद जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार वाढला आहे. शासकीय व खाजगी रुग्णालय फुल झालेली असून त्यामुळे अनेक रुग्णावर घरीच राहून उपचार करण्याची वेळ येत आहे. तसेच दवाखान्यात गेल्यावरही आपली सोय होईल की नाही याची खात्री नसल्यामुळे अनेक जणावर अंगावर दुखणे काढण्याची वेळ येत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ताबडतोब जम्बो करूणा रूग्णालय सेंटर होणे गरजेचे असल्याने सद्यपरिस्थितीत दिसून येत आहे.त्यामुळे रुग्णालयाची मागणी ताबडतोब मंजूर झाल्यावर जिल्हावासियांना दिलासा मिळणार आहे.
0 Comments