उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ मार्च रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले.
अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना लाडक्या मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला.
अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दोघांचा मृत्यू झाला.
कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने तसेच दुसरा मुलगाही अतिदक्षता विभागात असल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक संजय नवले यांचे वडील माणिकराव ( माजी शिक्षण अधिकारी, ८०) व आई मंदाकिनी ( ७८) हे मृत्यू पावले आहेत. दोघांचा मृत्यू शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना झाला. त्यांच्यावर आज सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेची अधिक माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ मार्च रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले. मुळचे चोराखळी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील ते रहिवाशी होते. त्यांच्यावर त्याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना लाडक्या मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या सोबत पुणे येथे नोकरी निमित्त स्थायिक झालेला त्यांचा मुलगा सुनील नवले हाही अडमिट होता. काही वेळानंतर त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा सुनीलला अतिदक्षता विभागात ॲडमिट केल्यानंतर त्यांना जबर मानसिक धक्का बसला,त्यावेळी पती पत्नी दोघे ओक्साबोक्सी रडूत राहिले. मात्र, उपचार सुरू असतानाच माणिकराव तात्याबा नवले ( माजी शिक्षण अधिकारी, ८०) यांचे शुक्रवारी (दि.२३) सायकांळी ५ वाजता निधन झाले. तर दोन तासातच पत्नी मंदाकिनी माणिकराव नवले ( ७८) यांनीही प्राण सोडला. पुत्रवियोगाचा धक्का बसल्याने अंथरुणाला खिळलेल्या या दोघांचीही प्राणज्योत मालवली. या दांपत्यावर आज सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रा.अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, डॉ.संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबियास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे
माणिकराव नवले हे कळंब तालुक्यातील कळंब ,ईटकुर ,खमसवाडी, दहिफळ येथील माध्यमिक शाळेत नोकरी केली. त्यानंतर त्यांचे शिक्षणाधिकारी म्हणून ही पदोन्नती झाली होती. त्यामुळे कळंब तालुक्यात त्यांचा मोठा विद्यार्थी वर्ग व दांडगा जनसंपर्क होता.कळंब येथील शिक्षक पतसंस्था उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. दहिफळ गावकऱ्यांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या दुःखद निधनाने कळंब तालुक्यातून व जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
1 Comments
भावपूर्ण श्रध्दाजंली
ReplyDelete