Subscribe Us

पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा सोमवारी पुन्हा पाहणी व आढावा दौरा.

 
उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  सोमवारी दि.26 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दरम्यान ते खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीसह कोरोना स्तिथीचा आढावा व काही ठिकाणी भेटी देणार आहे .
       गेल्या 8 दिवसाखाली 19 एप्रिलला पालकमंत्र्यांचा क्वारंटाइन संपलेल्या दिवशीच उस्मानाबादचा दौरा केला होता. लगेचच 26 एप्रिलला दुसरा उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जिल्हावासियांना मोठा आधार मिळत आहे व प्रशासकीय यंत्रणा अंग झटकून कामाला लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
     मागील दौऱ्यात पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोरोना अनुषंगाने अनेक बाबींचा आढावा घेतला होता व त्यात सापडलेल्या त्रुटी दुरुस्तीचे आदेश दिले होते त्यानुसार अनेक बाबतीत सुधारणा झाली आहे..प्रशासनात अनेक विषयात सुसूत्रता व समन्वय साधला जात असल्याने रेमडीसीवीर इंजेक्शन पुरवठा , ऑक्सिजन प्लान्ट व ऑक्सिजन पुरवठा यासारखे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागले आहेत .
        सोमवारी26 एप्रिल रोजी शंकरराव गडाख हे सकाळी 9.30 वाजता अहमदनगर येथून भूम येथे ग्रामीण रुग्णालयास भेट देतील व त्यानंतर गोलेगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट देणार आहेत .11.30 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेऊन दुपारी 1 वाजता कोविड बाबत आढावा बैठक घेतील त्यानंतर 1.40 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड कक्षास भेट व त्यानंतर 2 वाजता जिजामाता जिजाऊ मुलींचे वसतिगृह येथे तपासणी कक्षास भेट देतील. दुपारी 2:30 ते 3:30 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव.वेळ. अशा प्रकारे दौऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.





Post a Comment

0 Comments