Subscribe Us

दहिफळचा डिझेल पंप सील? मीटर मध्ये तफावत?नागरिकांची लूट! परिसरातून जोरदार चर्चा


 
                                              संग्रहित चित्र
तेरणेचा छावा/दहिफळ:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील  डिझेल पेट्रोल पंपाला सोमवार (दि.8 डिसेंबर) रोजी दुपारी अचानक  कंपनीच्या सोलापूर येथील सेल्स ऑफिसर नी तपासणी करून डिझेल पंप  सील केल्याच्या परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. 
     याविषयी सविस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील दहिफळ येथे कळंब रोडला डिझेल पेट्रोल पंप असून या पंपाला सोमवार (दि.8 डिसेंबर) रोजी सोलापूर येथील कंपनीच्या डेपोच्या झोनल ऑफिसरने तपासणी करून डिझेल पंप सील केल्याची घटना घडली असल्याची ऐकावयास मिळत आहे .पंपातील मीटर मध्ये तफावत अथवा मिक्स अशा प्रकारामुळे सील केले असल्याची नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत, याविषयी सोलापूर डेपोच्या झोनल अधिकाऱ्याला फोनची संपर्क साधला असता मी पंपावर रिपोर्ट केलेला असून तो आपण पाहू शकता,माझ्याकडे दिवसातून पाच ते सहा पंपाची तपासणीचे काम असल्यामुळे नेमकं कारण मला आठवत नसल्याचे व नंतर आपल्याला कळवतो असे यावेळी बोलताना सांगितले. या  डिझेल पंपावर परिसरातील दहा ते बारा खेडेगावातील व इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशाप्रकारे तफावत जर येत असेल तर वाहन धारकाची मोठी लूट कित्येक दिवसापासून नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती. अशी ही दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास येत आहे.
  त्यामुळे ग्रामीण भागातील  पंपावर अशाप्रकारे सील केल्यामुळे चर्चेला मात्र मोठ्या प्रमाणात उधान आले आहे.

Post a Comment

0 Comments