कळंब तालुक्यातील 8 जिल्हा परिषद निवडणूक जागेसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत.
संग्रहचित्र
तेरणेचा छावा/कळंब:-
जिल्हा परिषद ईटकुर गटातून पल्लवी बळवंत तांबारे, विठ्ठल रामभाऊ माने, अनंत नानासाहेब लंगडे, शिंदे बाळकृष्ण दाजीराम हे चार उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, मंगरूळ गटातून जयंत रामभाऊ कुंभार, बालासाहेब धनराज जाधवर, भीमराव धर्मराज हगारे, प्रतिक प्रकाश गायकवाड या चार जणांची उमेदवारी फायनल झाली आहे, डिकसळ गटातून वर्षा संजीत मस्के ,शितल धनंजय वनकळस, पूजा तुषार शिंदे ,ज्ञानेश्वरी विशाल वाघमारे या चार उमेदवारात निवडणूक सामना रंगणार आहे शिराढोण जिल्हा परिषद गटातून नितीन लक्ष्मण यादव, बाबासाहेब सिताराम सोनके ,कांचनमाला उत्कर्ष संगवे यांच्यात तिरंगी फाईट होणार आहे,
खामसवाडी गटातून बालाजी अल्टे ,विश्वास कोकणे, मनीषा वाघमारे ,अशोक कसबे, दीपक ताटे ,प्रल्हाद तुपसुंदरे ,जितेंद्र यादव यांच्यात सप्तरंगी सामना होणार आहे मोहा जिल्हा परिषद गटातून सीमा राजू झोरी ,रूपाली बालाजी नागटिळक , जाहिदाबी मोमीन सलीम सुजाता गौतम मडके यांच्यात चौरंगी सामना होणार आहे. नायगाव गटातून उद्धव बाजीराव शितोळे अनिल रामभाऊ साळुंखे कृष्णाली शिवाजी चौधरी जगदीश विठ्ठलराव खडबडे संजय त्र्यंबकराव दुधगावकर पाटील
येरमाळा जिल्हा परिषद गटातून कोकाटे अनुजा रामकिशन छाया दिलीप वाघमारे सुनंदा सुब्राव वाघमारे कविता सुनील खुणे यांच्या चौरंगी सामना होणार आहे.
अशाप्रकारे कळंब तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटातून 39 उमेदवारांमध्ये कुठे तिरंगी कुठे चौरंगी कुठे पंचरंगी तर कुठे सप्तरंगी सामना होताना दिसून येत आहे. निवडणुक प्रत्यक्ष प्रचाराला बुधवार (दि.28 जानेवारी)पासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. कोणता उमेदवार विचाराचा कोणत्या मुद्द्यावर लढणार कोण कुणाला भिडणार याचा उद्यापासून रणसंग्राम सुरू होत आहे
0 Comments