तेरणेचा छावा/कळंब:-
तालुक्यातील 16 पंचायत समिती गणासाठी 57 उमेदवार निवडणूक लढवत आहेत ईटकुर गणासाठी आत्माराम बिक्कड, रामचंद्र सांगळे,दिनकर क्षीरसागर बाबासाहेब कोढवाळे मस्सा गणातून तुकाराम थोरात, राजश्री वरपे मंगरूळ गणातून शारदा गायकवाड, प्रणिता चव्हाण, सुनंदा तौर हासेगाव गणातून लक्ष्मी तोडकर, राणी राऊत डिकसळ गणातून सचिन काळे नामदेव जाधव ,अभय जाधव, नितेश पवार ,दत्तात्रय पौळ ,रोहिदास राखुंडे लोहटा (पूर्व) गणातून इंदुबाई ओव्हाळ,सोनाली झोंबाडे शिराढोण गणातून ज्ञानेश्वर खडबडे ,कलीम बागवान ,गजानन माकोडे ,बंडू अंकुशे, झेलम शिंपले जवळा (खु) गणातून पांडुरंग घोगरे ,मनोज घोगरे, गुणवंत पवार ,मुकरंदाबाई डोंगरे नायगाव गणातून मनीषा टेकाळे पाटील, सीमा टेकाळे, प्रेमा नरवडे, जयश्री शितोळे रांजनी गणातून मनीषा देशमुख ,योगेश्वरी पवार, प्रतीक्षा साळुंखे ,शबाना शेख खामसवाडी गणातून किरण पाटील, सुवर्णा पाटील ,नितीन बंडगर ,महेंद्र शेळके देवळाली गणातून उमाकांत एडके, सचिन एडके, बालाजी वाघमारे ,विठ्ठल एडके ,बळीराम नवगिरे मोहा गणातून अनुराधा राहुल दिघे ,रत्नमाला कल्याण दिघे ,पूजा श्याम नागटिळक गौर गणातून तात्यासाहेब देशमुख श्याम देशमुख ,तुषार वाघमारे ,बालाजी भातलवंडे येरमाळा गणातून वृषाली राहुल पाटील ,उषाबाई वशिष्ठ बारकुल चोराखळी गणातून शिल्पा भगवान ओव्हाळ ,अलका दयानंद खुणे, त्रिशीला लक्ष्मण खुणे अशाप्रकारे 57 उमेदवार कळंब पंचायत समिती गणातून आपले नशीब आजमावत आहेत. नेमकं निवडणूक कुठल्या मुद्द्यावर गाजते कोण कुणाला भारी पडतं हे एक-दोन दिवसातील प्रचारावरूनच समजणार आहे. काही ठिकाणी दुरंगी काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी तर एका ठिकाणी पंचरंगी निवडणूक आपणास पाहावयास मिळत आहे.
0 Comments