Subscribe Us

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाकडून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या फोटोचा वापर कळंब तालुक्यात करण्यात येऊ नये.


तेरणेचा छावा/कळंब:-
सदर पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे संयुक्त निवेदन करण्यात येते कि जि.प. व पं.स. निवडणूकीचा अनुशांगाने महाविकास आघाडीतुनच निवडणूक लढवण्याची भुमीका दोन्ही पक्षाने स्वीकारली होती, परंतु महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना  (उबाठा) पक्षाने अंतर्गत अडचणीमुळे तालुक्यातील सर्व गट गाणात उमेदवार दिल्याकारणाने मविआचा संयुक्त पॅनल होऊ शकलेला नसला तरी विरोधी पक्षाला सत्तेत येण्यापासुन रोखण्याच्या निर्णयावर मविआचे सर्व पक्ष ठाम असुन मैत्रीपुर्ण लढतीचा पर्याय स्विकारण्यात आलेला आहे.
          मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या समविचारी पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून खामसवाडी,ईटकुर, शिराढोन व मंगरुळ या गटातुन तर कॉंग्रेस पक्षाकडू येरमाळा व डिकसळ गटातुन जिल्हा परिषदेसाठी  उमेदवार देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ईटकुर, शिराढोन, जवळा, मंगरुळ, गौर, रांजणी, नायगांव, देवळाली, गणातुन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे. दोन्ही पक्षांनी कुठेही एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेले नसुन दोन्ही पक्षाकडून आपापल्या कार्यकर्त्यांना सहकारी पक्षाच्या उमेदवारांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या समविचारी दोन्ही पक्षांनी मोजक्या जागांवर सक्षम उमेदवार दिलेले असुन सर्वच्यासर्व जागांवर विजय प्राप्त करण्याचा निर्धार करण्यात येत आहे. 
       तसेच या पत्राद्वारे इतर कळविण्यात येत आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाकडून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या फोटोचा वापर कळंब तालुक्यात करण्यात येऊ नये.

Post a Comment

0 Comments