तेरणेचा छावा/धाराशिव:-
येडशी येथील भाजपचे युवा नेते संतोष भैय्या सस्ते यांनी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवार 25 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान धाराशिव येथे प्रवेश केला यावेळी धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी, अजित पिंगळे, येडशीचे उपसरपंच सुनील शेळके, समाधान पाटील धनंजय शेळके सह समर्थकांनी मोठी गर्दी होती.
येडशी येथील भाजपचे युवा नेते संतोष भैय्या सस्ते यांच्या भावाची पत्नी शुभांगी सुधीर सस्ते यांना शिवसेना शिंदे गटाकडून येडशी पंचायत समिती उमेदवारी फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यामुळे संतोष भैया सस्ते आणि समर्थकांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रवेश केल्यामुळे येडशी शिवसेनेचे मोठी ताकद निर्माण झाल्यामुळे शिवसैनिकात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments