Subscribe Us

मारुती सरांचं बंड कसं होणार थंड!


 
 तेरणेचा छावा/दहिफळ:-
      गौर पंचायत समिती गणामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सारिका मारुती देशमुख यांची उमेदवारी फायनल झाल्यात जमा असल्याचे बोलले जात होते,परंतु कुठे माशी शिंकली आणि त्यांचा पत्ता कट झाला.
    मारुती देशमुख सर मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पक्षनिष्ठा जपत सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असतो. 
   गौर पंचायत समिती गौर पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांची उमेदवारी फायनल असल्याचे बोलले जात होते,विरोधी पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म घेण्यासाठी आग्रह असतानाही त्यांनी फक्त पक्षनिष्ठेसाठी  विरोध दर्शवला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयातून सांगण्यात येत आहे.
  सारिका मारुती देशमुख यांना पक्षश्रेष्ठीने डावल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज असून  मारुती सर यांच्या सुविद्य पत्नी सारिका देशमुख यांचा अपक्ष असलेला फॉर्म न काढण्यासाठी मोठा दबाव आणला जात आहे. सर फार्म काढू नका आपण पक्षाला दाखवून देऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारे कार्यकर्त्यातून बंडखोरी साठी मारुती सर यांच्यावर दबाव वाढत आहे. नेमकं पक्षनिष्ठा की कार्यकर्त्यांची मर्जी अशा द्विधामनस्थिती मारुती सर यांची झाली असल्यामुळे नेमकं कोणता निर्णय घ्यावा हा त्यांच्यापुढे पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर फॉर्म काढतात की अपक्ष निवडणूक लढवितात ही येत्या 27 तारखेलाच समजणार आहे. त्यामुळे मारुती देशमुख बंड करतात की होतात थंड हे परवा संध्याकाळपर्यंत समजणार मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments