Subscribe Us

सौ.ज्योती तुकाराम जगताप निवडणूक लढविण्याच्या तयारीत!


  
तेरणेचा छावा/धाराशिव:-
     येरमाळा जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सौ ज्योती तुकाराम जगताप निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या त्यांनी मागील अनेक महिन्यापासून मतदार संघातील जनसंपर्क व प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला होता. त्यांच्या या परिसरातील गाठीभेटी व जनसंपर्कमुळे त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जात होती, त्यांच्या उमेदवारीसाठी चोराखळी या गावातील गावकऱ्यांनी खासदार आमदार यांच्याकडे उमेदवारीची मागणी करत गावकऱ्यांनी निवडून आणण्याची ग्वाही दिली होती. यावेळी तुम्हाला उमेदवारी मिळून जाईल तुम्ही कामाला लागा असे सांगून आश्वासित केल्याचे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड.मिराजी मैदाड यांनी सांगितले.  
    पक्षश्रेष्ठींनी शब्द न पाळल्याचे सांगत गावातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असून त्यांनी सौ.ज्योती तुकाराम जगताप यांना अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येत आहे.कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या उमेदवारी कायम ठेवतात की उमेदवारी अर्ज काढून घेतात हे लवकरच समजणार आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी न दिल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते वेगळा विचार करण्याच्या मार्गात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे येरमाळा जिल्हा परिषद गटात उमेदवारी न दिल्यामुळे असंतोषाचा  नेमका फटका कोणाला बसतो तसेच ह्या असंतोषाचा भडका होण्याअगोदर पक्षश्रेष्ठी काही मार्ग काढते याकडे परिसरातील  नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments