Subscribe Us

अखेर उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे देवदत्त मोरे यांचा अर्ज वैध.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
येडशी जिल्हा परिषद गटाचे  उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार देवदत्त मोरे यांच्या उमेदवारी वरील आक्षेप पेटाळल्याने येडशी गटात भाजप विरूध्द उध्दवसेनेत तुल्यबळ लढत होणार आहे.
   जिल्हा परिषद गट.क्र २१  मध्ये येडशी गटात देवदत्त भागवत मोरे रा कसबे तडवळे यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती परंतू या गटातील भाजप चे अधिकृत उमेदवार संजय महादेव लोखंडे व सहदेव विश्वनाथ करंजकर रा कसबे तडवळे यांनी देवदत्त मोरे यांना २००१  नतंर तीन व अगोदर एक अशी एकूण चार अपत्य असल्याची आक्षेप नोंदवत अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णयअधिकारी औकांर देशमुख यांच्या कडे करण्यात आली होती यावर गुरूवार व शुक्रवारी दोन दिवस सुनावणी घेण्यात आली
परंतू शुक्रवारी सायंकाळी याबाबत देवदत्त मोरे यांचा अर्ज वैद्य ठरवण्यात आला हि निवडणूक रंगतदार होणार आहे.मोरे यांच्या कडुन ॲड रमेश‌ मुडे यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ॲड प्रशांत लोढे, ॲड सचिन अबंर, ॲड अजिंक्य मगर, ॲड संघदिप वाघमारे, अक्षय धुमाळ यांनी मदत केली.
   या आक्षेप निर्णयाकडे येडशी गटातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. प्रथमदर्शनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका लोखंडे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार देवदत्त मोरे यांच्यात जरी दिसत असली तरी खरे चित्र मात्र 27 जानेवारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments