Subscribe Us

हेल्मेट जनजागृती,वाटप व रक्तदान शिबिर संपन्न.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
रस्ता सुरक्षा अभियान 2026चे अनुषंगाने हेल्मेट जनजागृती करणेसाठी येडशी टोल नाका -सोनेगाव चौक -जनता विद्यालय -एस बी आय शाखा येडशी-येडशी गाव-येडशी ओपी -येडशी बसस्टॅण्ड चौक-ते म पो केंद्र पर्यंत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार  तसेच येडशी टोलप्लाझा येथील कर्मचारी सोबत IRB पेट्रोलिंग गाडी,IRB ऍम्ब्युलन्स यांनी बाईक रॅली काढून जनजागृती सोमवार (दि. 26 जानेवारी) रोजी करण्यात आली.
    तसेच म पो केंद्र धाराशिव हद्दीतील अपघातामध्ये माहिती देणारे व मदत करणारे मृत्यूजय दूत यांना हार व पुष्पगुछ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मृत्युंजय दूत,टोलनाका कर्मचारी,व परवाना धारक दुचाकी चालक यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. 
तसेच सह्याद्री हॉस्पिटल यांच्या सह्याद्री ब्लड बँक चे डॉ.करंजकर व त्यांचे सहकारी यांचे मार्फतीने रक्तदान शिबीर आयोजन करून  रक्तदान करण्यात आले. सदर शिबिरा मध्ये इच्छुक 45 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
    हेल्मेट जनजागृती केल्यामुळे हेल्मेट ही दुचाकी वाहनधारकाला अत्यावश्यक बाब बनलेली असल्याचे नागरिकांतूनच या गोष्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे या शिबिराचा उद्देश सफल होताना दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments