Subscribe Us

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे


तेरणेचा छावा/गौर:-
गौर येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थ तुकाराम ज्ञानोबा घाटोळे यांनी शनिवार (दि. 13 डिसेंबर) रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
    गावात दारूबंदीसाठी ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्यात आला होता व तो  येरमाळा पोलीस स्टेशन कडे देण्यात आला होता परंतु पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकाकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.याचीच परिणिती म्हणून ग्रामस्थ तुकाराम ज्ञानोबा घाटोळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, येरमाळा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडे 13 डिसेंबर रोजी आमरण उपोषण बसणार असल्याचे निवेदन दिले होते.त्यानुसार 13 डिसेंबर रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले यानंतर गावातील महिलांनी या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवत पाठिंबा दिला. गावातील दारूमुळे संसार धुळीला मिळत असून गावातील दारू कायमचीच बंद झाली पाहिजे असा निर्धार महिलांनीही केला होता.   .   यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधत आमरण उपोषण  सोडविण्यासाठी आपण तोडगा काढून सहकार्य करावे याविषयी निवेदन सादर केल्यानंतर येरमाळा पोलीस स्टेशन खडबडून जागे होऊन त्यांनी गावातील दोन अवैद्य दारू विक्रेत्यांना गौर व परिसरात कुठेही अवैद्य दारू विक्री करताना दिसून आल्यास धाराशिव व सोलापूर दोन जिल्ह्यातून हद्दपार करणार असल्याच्या नोटीसा देण्यात आल्या. यानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने दोन दिवसापासून चालू असलेले आमरण उपोषण रविवार (दि.14 डिसेंबर )रोजी अखेर सोडवण्यात प्रशासनाला यश आले. यावेळी ग्रामस्थ आबासाहेब देशमुख, अशोक लंगडे पाटील,अनिल देशमुख, धनंजय देशमुख, माधव देशमुख ,पापा मुंडे,बीट अंमलदार सागर कांबळे, पोलीस कर्मचारी कमलाकर सुरवसे सह ग्रामस्थांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments