यावर्षीपासून अभिनय उपक्रम यूपीएससी एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 11000 चे सहकार्य यात्रा कमेटीचा निर्णय.
तेरणेचा छावा/दहिफळ:-
येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानची चंपाषष्ठी (सटीची) यात्रा मोठ्या धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बुधवार ( दि.26 नोव्हेंबर) रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी दिवसभर दंडवत, मानाचे नैवेद्य मिरवणूक, नंगर मिरवणूक, गाडा बगाडा मिरवणूक या धार्मिक कार्यक्रम व संध्याकाळी एकापेक्षा एक अप्सरा या सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
गुरुवार (दि.27 नोव्हेंबर) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोंगाचा कार्यक्रम व संध्याकाळी लोकनाट्य तमाशा कार्यक्रमांनी यात्रेत रंगत आली.
शुक्रवार (दि. 28 नोव्हेंबर )रोजी दुपारी जंगी कुस्त्या व संध्याकाळी गर्जा महाराष्ट्र या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकाची मने जिंकली.
तर गावकऱ्यांच्या आग्रहास्तव शनिवार( दि. 29 नोव्हेंबर) रोजी मदमस्त अप्सरा हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा कुठल्याही सरकारी अनुदानावर होत नसून गावाच्या लोकवर्गणीतून होत असते त्यामुळे गावकऱ्यांना हिशोब देणे हे यात्रा कमिटीचे कर्तव्य असतं आणि ते यात्रा कमिटीने पार पाडले त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीचे कौतुक केले जात आहे.
तसेच गेल्या 15 वर्षापासून राजे ग्रुप च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी 3 लाख रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जोशी बंधूंच्यावतीने दंडवटासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोफत चहाची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी यात्रेतील मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी अरविंद पाटील यांनी मोफत दोन एकर जमीन दिल्याबद्दल त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत आहे.मंदिर व प्रमावळासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांची, मंदिरासाठी झुंबर व पीओपी अर्पण करणाऱ्या 2003दहावी ग्रुप चे ,मंदिरावर लाईट डेकोरेशन साठी खंडेश्वरी ग्रुपने व्यवस्था केल्याबद्दल, गाडा बगाडा कमेटी, नवतरुण लेझीम पथक यांचे व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व ग्रामस्थ प्रशासन यांचेही गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वैजनाथ मते यांनी केलेल्या अहवानाला फिटनेस क्लब व इतर ग्रुपने प्रतिसाद दिल्याबद्दल ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेही कौतुक होत आहे. यात्रेला व्यापक प्रसिद्ध दिल्याबद्दल सर्व प्रसार माध्यमाचे यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने आभार आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
तसेच यावर्षीपासून यात्रा कमिटीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असून गावातील जे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी तयारी करत आहे त्यांच्यासाठी 11000 चे सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले असून यावर्षी दोन विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ देण्यात आला आहे जर याच्या व्यतिरिक्त जर कोणी आणखी चुकून राहिले असल्यास त्यांना ही लाभ देण्याचे कबूल केले आहे. यावर्षी खंडोबा मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे धार्मिक कार्यक्रम विना अडथळा पार पडले तसेच ग्रामस्थांना व परिसरातील भाविक भक्तांना यात्रेचा सुलभपणे लाभ घेता आला. यात्रा कमिटीच्या सर्व सभासदांनी 20 दिवसापासून यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतल्याने त्यांचेही गावकऱ्याकडून कौतुक केले जात आहे. अशाप्रकारे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानची सटीची यात्रा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
0 Comments