तेरणेचा छावा/वाशी:- वाशी तालुक्यातील इंदापूर येथील मागील अनेक वर्षापासून बंद पडलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होत आहे. याचा बॉयलर अग्निपूजन सोहळा उद्या दिनांक 8 डिसेंबर रोजी चार वाजता करण्याचे आयोजन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी या सोहळ्यास कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भैरवनाथ शुगर मिल्स चे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांनी केले आहे.
मतदारसंघातील शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या व दीर्घकाळ बंद पडलेल्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री व भूम परंडा वाशीचे विकासरत्न आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा सुरू होत असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या कारखान्याला पुनर्जीवन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आमदार सावंत यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
बॉयलर अग्निप्रज्वलन समारंभात कारखान्याचे चेअरमन श्री. अनिल सावंत आणि वाईस चेअरमन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.आमदार श्री. तानाजीराव सावंत साहेब हे मोळी पूजन (गव्हाणी पूजन) दिवशी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तानाजीराव सावंत साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन:
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याच्या व्यवस्थापनाने केले आहे.
हा कारखाना सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळून त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments