Subscribe Us

शिवसेनेच्या रॅलीस मतदाराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद...


तेरणेचा छावा/धाराशिव:- धाराशिव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचार रॅलीस मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
          शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली  उमेदवार नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत. प्रभाग चार ते प्रभाग आठ मध्ये गेल्या दोन दिवसापासून प्रचार रॅली काढली जात आहे. या भागातील मतदारांनी स्थानिक आणि हक्काचा उमेदवार निवडणुकीत उभा केल्याने, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव आणि कळंब येथे घेतलेल्या जाहीर सभांनी मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
          शिवसेना शिंदे गटाच्या वतीने,पाच प्रभागांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष आणि अन्य उमेदवारांना पुरस्कृत केलेले आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 ब विकास विलास जाधवप्रभाग 5 मधून लखन दशरथ मुंडे (अ), प्रभाग क्रमांक 5 (ब) पाटील प्रेमा सुधीर प्रभाग 6 मधून श्रीनिवास शशिकांत मुंडे(अ), प्रभाग क्रमांक 6 (ब) प्रीती अजय उंबरे प्रभाग 7 मधून रेशमा सुनील जानराव (अ), प्रभाग क्र. 8 (ब) देशमुख अमरसिंह कल्याणराव प्रभाग क्रमांक 11 (अ) मधून मुंडे दशरथ गोपाळ. वरील सर्व उमेदवारांनी प्रचारामध्ये मुसंडी मारली आहे
      धनुष्यबाण,कपबशी आणि इस्त्री या चिन्हांचे बटन दाबून मतदारांनी उमेदवारांना निवडून द्यावे अशी आवाहन संघटक सुधीर अण्णा पाटील यांनी काढलेल्या जंगीराली मधून केले आहे.
     प्रचार रॅलीस जनतेचा आण कार्यकर्त्यांचा,विशेषतःमहिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभतो आहे. रॅली दरम्यान संपूर्ण परिसर उत्साहाने भरून प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात शिवसेनेच्या विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवत आहे.
प्रभागातील सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील भक्कम नियोजनासाठी तिसरा पर्याय म्हणून मतदारांनी उमेदवारांना विजयी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.धाराशिवच्या प्रगतीसाठी मिळत असलेला वाढता लोकसमर्थनाचा प्रवाह निश्चितच विजयाची घोषणा करणारा आहे.
      यावेळी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचारफेरीला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments