Subscribe Us

तिसऱ्या पर्यायासाठी लोकांची पसंती पण उमेदवारालाच लोकांचे वावडे


                                    संग्रहचित्र
तेरणेचा छावा/धाराशिव:-
   धाराशिव नगरपालिकेचे मतदानाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली आहे तशी तशी निवडणूकीत आता रंगात येऊ लागली आहे.नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 201 उमेदवार रिंगणात आहेत. 
   प्रत्येक पक्ष आपला आपला जाहीरनामा व वचननामा मतदारापुढे जाहीर करण्यात गुंतलेला आहे. घरोघरी प्रचारासाठी उमेदवारांची रांग लागलेली असताना काही उमेदवार मात्र टोपली टाकण्याचे काम करताना दिसून येत आहेत.
    खरी फाईट तीन उमेदवारात असली तरी दोन उमेदवार जीवाचे रान करत आहेत तर एक उमेदवार नेमका कुठे आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे नागरिकांतून वेगवेगळ्या चर्चेला उधान आला आहे. 
       नागरिक तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असतानाही उमेदवार मात्र मतदारापर्यंत जाण्यात कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे, त्यामुळे नागरिकांना वेगळी शंका येऊ लागली आहे. कारण या आधीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काही उमेदवारांची मते खाण्यासाठी काही उमेदवार उभे ही केले होते व त्यांनी ऐन वेळेस निवडणुकीतून पळही काढला होता. कारण एका समाजाचे मतदान विशिष्ट उमेदवाराला न पडल्यामुळे दुसऱ्या उमेदवारासाठी फायदा होऊ शकतो ही रणनीती लक्षात घेता काही जणांनी हवा ही भरली असल्याची नागरिकांतून चर्चा चर्चिली जात आहे. कारण काही उमेदवार आपल्या गल्लीच्या बाहेर ही निघायला तयार नसल्याचे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
       यालाच म्हणतात देव निघाला द्यायला पदर नाही घ्यायला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पर्याय शोधणाऱ्या मतदारांची मात्र मोठी गोची होत आहे. 

Post a Comment

0 Comments