तेरणेचा छावा/दहिफळ:-
परिसरामध्ये प्रसिद्ध व मुख्य आकर्षण तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेल्या परंपरेनुसार सालाबादप्रमाणे पार पडणाऱ्या दहिफळ ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान यात्रेसाठी रविवार (दि.16 नोव्हेंबर) रोजी ग्रामदैवत खंडोबा मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत उपसरपंच अभिनंदन सुब्राव मते यांची यात्रा कमिटी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावर्षी बुधवार (दि.26 नोव्हेंबर) रोजी चंपाषष्ठीला मुख्य यात्रेला प्रारंभ होणार असून यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ उत्साहाने तयारीला लागले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यावर्षी खंडोबा मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे यात्रेतील धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना सहज सुलभतेने पाहता येणार आहेत.
यावेळी खंडोबा मानकरी,ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
0 Comments