तेरणेचा छावा/धाराशिव:-
तुळजापूरच्या राजकारणात सध्या रंगतदार वातावरण निर्माण झाले असून नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून युवा नेते विनोद पिंटू गंगणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी नोंदवल्यानंतर संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे.शहरातील सर्वच राजकीय चर्चांमध्ये गंगणे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या उमेदवारीमुळे मुकाबला अधिकच रोचक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विनोद पिंटू गंगणे यांनी अनेक वर्षांपासून तुळजापूर शहरात विविध सामाजिक,शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांद्वारे सक्रिय कार्य केले आहे.त्यांच्या या सातत्यपूर्ण समाजकारणामुळे त्यांच्याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये विश्वास व आपुलकी निर्माण झाली आहे.त्यांच्या समर्थकांमध्ये आजपासूनच आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.ठिकठिकाणी गुलाल उधळून गंगणे यांचे उमेदवारी स्वागत करण्यात आले आहे. समर्थकांचा दावा आहे की “आता निवडणुकीत फक्त मताधिक्य किती मिळते हे पाहायचे,विजय तर निश्चित आहे”—अशा जोरदार शब्दांत आत्मविश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
१५–२० वर्षांच्या समाजकारणाची भक्कम पार्श्वभूमी असलेले तसेच मागील दीड ते दोन दशकांपासून गंगणे यांनी तुळजापूरमध्ये केलेले समाजकारण हे त्यांचे प्रमुख बळ मानले जात आहे.
प्रत्येक समाजघटकांमध्ये वावर
अडचणीच्या काळात तत्पर मदत
युवकांना प्रेरित करणारे नेतृत्व
विकासात्मक उपक्रमांमध्ये सहभाग
या कारणांमुळे ते सर्वसामान्यांमध्ये सहज उपलब्ध नेता म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.
विनोद पिंटू गंगणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत चर्चांना वेग आला आहे.कोण उमेदवार उभा करायचा,कोणता रणनीतीचा आराखडा तयार करायचा याबाबत विरोधक काहीसे गोंधळलेले दिसत आहेत.दुसरीकडे,गंगणे यांच्या समर्थकांत प्रचंड ऊर्जा निर्माण झाली असून प्रचाराच्या दृष्टीने ते सज्ज झाले आहेत.
गंगणे यांच्या समाजकारणाला नागरिक मतदानाच्या माध्यमातून कितपत प्रतिसाद देतात,हे आगामी टप्प्यात स्पष्ट होणार आहे.शहरातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक लाट असल्याची चर्चा जोरात आहे;मात्र अंतिम निकालात ते कितपत प्रतिबिंबित होईल,याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे.
0 Comments