Subscribe Us

परवानगी नसताना फटाका कारखान्याचे काम सुरू, ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.


तेरणेचा छावा/दहिफळ:-
  दहिफळ येथे कुठलीही परवानगी न घेता  गट क्रमांक 192 मध्ये फटाके दारु कारखानेचे बांधकाम चालू आहे, त्या कारखान्यालगतच आमचे जनावरांचे गोठे आहेत व राहते घर पण आहे कुकुट पालन ऊसाची शेती आहे व गावाचा वाहतुकीचा दहीफळ मोहा कळंब मेन रस्ता आहे येणाऱ्या जाणाऱ्याला जीवीताला धोका होऊ शकतो व तसेच या पासून उद्या आमच्या जीवीतास व आरोग्यास काही हाणी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील.
  सदरील कारखान्यास कुठलीही परवानगी नसताना लगतच्या शेतकऱ्यांच्या व ग्रामसभेची परवानगी न घेता कामकाज चालू आहे.राहत्या घरालगतच कारखानेचे बांधकाम चालू असून ते तात्काळ थांबवावे.
    अन्यथा आम्ही 8 दिवसानंतर जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी व ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहोत.अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

सदर फटाका उद्योगासाठी गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या शासकीय प्रक्रिया परवानग्या काढण्याच्या प्रक्रियेत परवानगी मिळालेल्या आहेत. मी ही एक सुशिक्षित बेरोजगार असून माझ्यासह परिसरातील अनेक बेरोजगारांना या उद्योगामुळे रोजगारांना मिळणार आहे. काही ग्रामस्थ शेतकऱ्यांचा गैरसमज झालेला असेल तो आम्ही लवकरच दूर करू. गावकऱ्यांनीही आम्हाला सहकार्य करावे एवढीच अपेक्षा.
    भैय्या अवधूत एक सुशिक्षित 
     बेरोजगार नवउद्योजक

Post a Comment

0 Comments