Subscribe Us

नशामुक्त भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.हा उपक्रम यश मेडिकल फाउंडेशन संचलित येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, यांच्या वतीने सोमवार (दि.10 नोव्हेंबर) रोजी राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे, व्यसनमुक्तीबाबत प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे, तसेच आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देणे हा होता.
 जनता विद्यालय, येडशी  भारत विद्यालय, धाराशिव  श्री. जीवनराव गोरे विद्यालय, आळणी या शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
    कार्यक्रमात येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे, जनजागृती अधिकारी सौ. स्वाती भातलवंडे  आणि प्रसिद्धी प्रमुख श्री. सुजित ढेकळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. प्रात्यक्षिके, संवादात्मक सत्रे आणि प्रेरणादायी व्याख्याने याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडविण्यात आली असून कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली
      या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात आतापर्यंत सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, सर्वत्र प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments